Leopard Sightings; झोपलेल्या वनविभागामुळे माहूरात बिबट्यांचा धुमाकुळ; माहूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात बिबट्याच्या दर्शनाने दहशत -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। महिनाभराच्या जंगल सफारी नंतर माहूर शहरात बिबट्याने पुन्हा दर्शन देत धुमाकूळ घातल्याने उघड्यावर शौचास बसणाऱ्याची चांगलीच घाबरगुंडी झाली असून शहरातील जंगल व्याप्त असलेल्या मोकळ्या भुखंडावर बिबट्या फेरफटका मारत असल्याचे अनेकांच्या नजरेत पडले आहे. आतापर्यंत शहरात मनुष्यहानी झाली नसली तरी ही शहरातील मोकाट कुत्र्याची व पाळीव प्राण्याची संख्या माञ घटली आहे.तसेच पाळीव प्राण्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यांवर वन विभाग काहीच उपाय करीत नसल्याने बिबट्याच्या हल्याचे प्रमाण वाढले असून अशा वेळी मानव - बिबट संघर्ष अटळ आहे. कारण वन विभाग झोपलेला आहे आणि बिबट्या मात्र जागा आहे.
महिण्याभराआधी माहूर शहरासह तालुक्यात बिबट्या आपल्या जोडीदार आणि दोन पिल्लासह धुमाकूळ घालत होते. त्यावेळी माहूर शहरात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली होती. जंगली प्राण्यांसह मोकाट कुत्रे, शेतात बांधलेल्...
