Launch of Flag Day Fundraising : ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 1 कोटीपर्यत निधी संकलन करण्याचा निर्धार -NNL
नांदेड| ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणासाठी हा निधी संकलित करण्यात येतो. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024-25 संकलन उद्दिष्ट 1 कोटीपर्यत करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, वीरपिता, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक यांच्या उपस्थितीत ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.
ध्वजदिन निधी संकलनासाठी यावेळी क्युआ...
