Bharat Parv : लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व 2026’ महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत
नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा उत्साह द्विगुणित करणारा ‘भारत पर्व 2026’ हा भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकारातून होणाऱ्या या महोत्सवासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे.
26 जानेवारी रोजी हा महोत्सव सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत तर 27 ते 31 जानेवारी दरम्यान दररोज दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत खुला राहणार आहे. देशभरातील विविध राज्यांच्या पर्यटन, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन या महोत्सवातून घडणार आहे.
या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य आणि आकर्षक दालन उभारण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटन वारशाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-कि...
