Krishna Dalve won the top rank in the chess competition : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ स्पर्धेत कृष्णा दळवे याने मिळविला अव्वल क्रमांक -NNL
हिमायतनगर| हिमायतनगर येथील कृष्णा दत्तात्रय दळवे यां विद्यार्थ्याने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ स्पर्धेत आपलं नाव नोंदविल आहे. तालुक्यातील प्रथम येण्याचा बहुमान कृष्णाने मिळविला असून, या यशाबद्दल सर्व स्तरातून याच अभिनंदन केलं जात आहे.
येथील राष्ट्रसाधना पब्लिक स्कूल येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील 14 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत हिमायतनगर येथील कृष्णा दत्तात्रय दळवे यांनी प्रथम फेरीतील युग मलगे यास 28 व्या चालीमध्ये गारद केले. तसेच दुसऱ्या फेरीमधील मोक्ष देवेलवाड यास तेराव्या फेरीमध्ये पराभूत केले आणि शेवटची आणि अंतिम फेरी ही यशराज चव्हाण यांच्यासोबत झाली. त्यावेळी कृष्णा दत्तात्रय दळवे यांने अवघ्या सातव्या चालीत त्यास पराभूत करून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ स्पर्धेत आपलं नाव नोंदविल. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तर...
