Survey of Nanded-Latur railway line : नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर – खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश -NNL
नांदेड| नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे मंजूर करण्यात आला असून, सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात ही बाब नमूद आहे.
खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुमारे १०४ किलोमीटर लांबीच्या नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम 'महारेल'च्या माध्यमातून प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचारार्थ पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार सध्या फायनल लोकेशन सर्व्हे सुरु असून, त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी आपल्या पत्रात म...
