Job-friendly certificate courses launched | ‘स्वारातीम’ विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये नौकरीकरिता उपयुक्त असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु – NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून तसेच नौकरीकरिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे.
जैवशास्त्र संकुलामध्ये चालणाऱ्या या कोर्समध्ये सर्टिफिकेट कोर्स इन प्रिन्सिपल्स अँड मेथडस इन ऑरनिथॉलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इन मायक्रोस्कोपी अँड मेन्टेनन्स ऑफ मायक्रोस्कोप, सर्टिफिकेट कोर्स इन इक्विपमेंट्स अँड फोटोग्राफी ऑफ बर्ड्स, सर्टिफिकेट कोर्स इन बायोलॉजी-झूलॉजी म्युझियम मेंटेनन्स अँड मॅनेजमेंट व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सर्टिफिकेट कोर्स इन इंट्रोडक्शन टू ॲनिमल व्हायरसेस या प्रत्येकी तीन महिने कालावधीच्या पाच प्रमाणपत्र अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण व जैवविधता जतन करण्याबरोबरच स्वयंरोजगार व नौकरीकरिता उपयुक्त असे शिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रमाणपत्र प्रवेशासाठी शैक्षणिक अहर्ता बारावी विज्ञान...
