Palkhi Padayatra ceremony : विष्णुपुरी ते माता रत्नेश्वरी जानापुरी पालखी पदयात्रा सोहळ्यास ऊत्स्फुर्त प्रतिसाद -NNL
नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्त काळेश्वर मंदीर विश्वस्त समिती व आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री माता रत्नेश्वरीदेवी जानापुरीस साडी-चोळी अर्पण ,विष्णुपूरी ते माता रत्नेश्वरी देवी मंदीर पदयात्रा पालखी सोहळयास विष्णुपूरी गावातील समस्त गावकरी, महिला यांनी सहभाग नोंदविला.
दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबर्डे यांनी गोदावरी नदीतील पाण्याने भरलेल्या कलश व महादेव पिंड मुर्ती पुजन केल्यानंतर या भव्य पालखी पदयात्रा सोहळ्याला सुरूवात झाली. दरवर्षी प्रमाणे याही चौथ्या वर्षी 9 ऑक्टोबर 24 रोजी सकाळी 8 वाजता आमदार मोहनराव हंबर्डे, काळेश्वर मंदीर विश्वस्थ व सर्व विष्णुपूरी गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत कलश पुजन व महाआरती झाल्यानंतर सुरूवात झाली, प्रारंभी विधीवत रथ यात्रा माता रत्नेश्वरी जानापुरी साडी चोळी पुजन करण्यात आले. यावेळी काळेश्वर भगवान कि जय, जय माता दी...
