DIG Shahaji Umap : कर्तव्यदक्ष डीआयजी शहाजी उमाप यांनी पाठविलेला संदेश समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL
नांदेड। परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून ३० जुलै रोजी माननीय शहाजी उमाप साहेबांनी पदभार स्वीकारला. ही बातमी नांदेडकराना सुखद धक्का देणारी निश्चितच होती. आणि समाज विघातक कारवाया करणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारी होती.उमाप साहेबांकडून सर्वसामान्य जनतेला खुप अपेक्षा आहेत.
तसे पहिले तर मागील एक ते दीड महिन्यापासून साहेबांच्या येण्याची प्रतीक्षा नांदेडरांना होतीच. परंतु कार्यालयीन अडचणीमुळे थोडा वेळ लागला. मी साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड डॉ.अण्णा भाऊ साठे जिल्हा जयंती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने जयंती चांगली होऊन नवीन पायंडा पडावा यासाठी प्रयत्नशील होतो.
जिल्ह्यातील अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विशेष अतिथी म्हणून मुख्य कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते.त्यामध्ये जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत,पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा. अबीना...
