Shrirang Gaikwad : श्रीरंग गायकवाड यांचे वक्तव्य संभ्रमित करणारे : स. रविन्द्रसिंघ मोदी
नांदेड| संत साहित्याचे अभ्यासक आणि दैनिक तरुण भारत (कोल्हापूर) संपादक श्रीरंग गायकवाड यांनी शुक्रवारी श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन केंद्र येथे एका व्याख्यानात संत नामदेवजी महाराज यांनी भ्रमन्ती केली. पंजाब मध्ये जाऊन शीख धर्माचा पाया घातला, असे दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी वरील वक्तव्य परत घ्यावे अशी मागणी अध्यासन केंद्र सल्लागार समितीचे सदस्य आणी शीख धर्माचे अभ्यासक स. रविंद्रसिंघ मोदी यांनी येथे केली आहे.
शुक्रवार दि. 21 मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठाच्या श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन केंद्र येथे श्री गुरु गोबिंद सिंघजी अध्यासन केंद्र आणी नानकसाईं फाउंडेशन नांदेड तर्फे साहित्यिक श्रीरंग गायकवाड यांचे "संत नामदेव महाराज : लौकिक व वांग्मयन योगदान " या विषया वर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ...
