Ips Bhagwat ; आयपीएस भागवत यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट
नांदेड/हैद्राबाद। मूळचे महाराष्ट्राचे असलेले व सध्या तेलंगणात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी कार्यरत असलेले महेश भागवत यांना डॉ डी वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
शासनाच्या सेवेत कार्यरत असताना फार कमी अधिकाऱ्यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट दिली जाते. पण सध्या तेलंगणा राज्यात अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था पदावर कार्यरत असणारे महेश भागवत यांना डी वाय पाटील विद्यापीठातर्फे ही मानद डॉक्टरेट एका भव्य समारंभात प्रदान केली आहे.
भागवत हे मूळचे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आजवर अनेक लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे त्यातून विविध पदांसाठी सुमारे 2 हजार तरुणांची निवड झाली आहे. भागवत यांनी मानवी तस्करी या विषयात मोठे भरीव काम केले आहे. बालकामगार या विषयावर देखील त्यांचे ...
