Friday, June 26

Tag: Interstate bag lifting gang busted

Bag lifting : अंतरराज्य बॅग लिफ्टींग टोळीचा पर्दाफाश; 18 लाखांची रोकड हस्तगत

Bag lifting : अंतरराज्य बॅग लिफ्टींग टोळीचा पर्दाफाश; 18 लाखांची रोकड हस्तगत

क्राईम, नांदेड
नांदेड | जिल्ह्यातील गुन्हेगारीवर निर्णायक आघात करत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस ठाणे वजिराबाद यांच्या संयुक्त पथकाने बॅग लिफ्टींग करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आरोपींकडून 18 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील जुना मोंढा परिसरात झालेल्या बॅग लिफ्टींगच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मा. अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या आदेशानुसार “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. 200 सीसीटीव्ही फुटेज, सायबर व NatGrid तपास पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करून तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेज, सायबर फूटप्रिंट्स व NatGrid तपशील तपासण्यात आले. तपासाचा धागा महाराष्ट्राबाहेर जाताच पथके कर्नाटक व तेलंगणा येथे रवाना...
error: Content is protected !!