Three dead ; कपडे धुवण्यासाठी नदीवर गेलेल्या महिलेसह २ मुलींचा बुडून मृत्यू; भायेगाव येथील दुर्दैवी घटना
उमरी/नांदेड। गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेसह सोबत असलेल्या २ मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैर्वी घटना नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मौजे भायेगाव येथे शनिवारी दिनांक 06 रोजी दुपारी घडली. काही तासाच्या शोध मोहिमेनंतर स्थानिक नागरिकांनी तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.
उमरी तालुक्यातील भायेगाव येथील गावाजवळ असलेल्या गोदावरी नदीपात्रात गावातील अनेक महिला कपडे धुण्यासाठी जातात. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास गावातील महिला महानंदावाई भगवान हनमंते वय ३४, पायल भगवान हनमंते वय १४ या माय लेकीसह ऐश्वर्या मालु हणमंते वय १३ या तिघी कपडे धुण्यासाठी नदी पात्रात गेल्या होत्या.
यावेळी पायल पाण्यात पाय घसरुन पडल्याने ती पाण्यात बुडत होती. तिला वाचविण्यासाठी आई महानंदा पाण्यात उतरली, या माय लेकी पाण्यात बुडतांना पाहून सोबत असलेल्या ऐश्वर्याने आरड ओरड करत पाण्या...
