TB screening campaign : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत शंभर दिवसीय टीबी रुग्णशोध मोहीमेचे उद्घाटन – NNL
अर्धापूर| आज दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर मालेगाव ता. अर्धापूर जिल्हा नांदेड येथे श्री गुरुगोविंद सिंह जी स्मृती जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे सर , मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून शंभर दिवसीय टीबीरुग्ण शोध मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी संशयित रुग्ण, टीबी रुग्ण संपर्कातील व्यक्तींना व इतर उपस्थित नागरिकांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई सर यांनी टीबी म्हणजेच क्षयरोग या आजाराची कारणे, उपचारपद्धती, आजाराविषयी असणारे गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. राजाभाऊ बुट्टे सर यांनी टीबी मुक्त भारत व टीबी रुग्ण शोध मोहिमे मध्ये आरोग्य कर्मचारी व विशेषतः ग्रामपातळीवरी...
