in their bank account : निराधार लाभार्थ्यांना मिळणार आता थेट बँक खात्यात अनुदान -NNL
नांदेड| संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा माध्यमातून लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत केली जात आहे. यासाठी आधार प्रमाणिकरण अत्यावश्यक असून दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात संजय गांधी योजना विभागाशी त्वरित संपर्क सा...
