Vitthal : नामदेवच्या रूपात विठ्ठल भेटला
मी पंढरपूरला जाण्यासाठी हदगाव येथून देगलूर गाडीने बसलो, नांदेड येथे एसटी स्टँडवर उतरलो. पाहतो तर मी ज्या सीटवर बसलो होतो त्याच सीटवर माझा मोबाईल विसरला आणि ती सदर गाडी देगलूरकडे रवाना झाली होती. माझा एकवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल गेल्याचे मला कळले. मी हतबल झालो काय करावे सूचना झाले. मग माझ्या स्वतःच्या मोबाईल वर फोन केला (Met Vitthal in the form of Namdev) असता तो फोन मला वारंवार व्यस्त येत असल्याचे कळवण्यात आले.
आता म्हणलो मोबाईल गेलाच. पण काय चमत्कार मी ज्या सोबत्याच्या मोबाईल वरून फोन केला होता त्यावेळी तो व्यस्त असलेला मोबाईल पुन्हा वाजला. आणि तिकडून आवाज आला की, हा मोबाईल तुमचा आहे का? मला तर काहीच कळेना? स्वप्नागतगत झाली होती माझी. मी म्हटलं हो साहेब माझाच आहे हो,
आणि मी पंढरपूरला चाललोय तेवढ्यात त्या व्यक्तीने मला तुम्ही नरसी बसस्थानकामध्ये या असा आवाज दिला .आणि मी लगेच दुसऱ्य...
