OBC reservation : ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश अन्यायकारक
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाने दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील व्यक्तींना मराठी कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र (OBC reservation) मिळवून देण्याचा मार्ग खुला केला आहे. या निर्णयाचा हिमायतनगर तालुक्यात ओबीसी समाजबांधवांनी जाहीर निषेध नोंदवत तीव्र विरोध केला.
फक्त निषेधच नाही तर शासनाने काढलेल्या अन्यायकारक अध्यादेशाची होळी करून ओबीसी समाजाने आपला रोष व्यक्त केला. यावेळी शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक ( Inclusion of Maratha community in OBC reservation is unfair) आहे. यामुळे ओबीसी समाजातील सुमारे ४०० हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून, शिक्षण व नोकरीच्या क्षेत्...
