Friday, July 3

Tag: in Nanded Lok Sabha by-election

Ravindra Chavan : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी -NNL

Ravindra Chavan : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा 1457 मतांनी पराभव केला आहे. सहा महिन्यापूर्वी काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांचे चिरंजीव रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी चुरशीच्या लढतीत ही जागा कायम ठेवली आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीमध्ये केरळमधील वायनाड व महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. 25 वर्षानंतर नांदेड येथे एकाचवेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्यात. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान झाले. गेल्यावेळी 61 टक्के मतदान झालेल्या लोकसभेमध्ये पोटनिवडणुकीत 67.81 टक्के मतदान झाले. शेवटच्या काही फेऱ्यामध्ये त्यांनी मताधिक्य मिळवत ही जागा काँग्रेसकडे कायम ठेवली. रविंद्...
error: Content is protected !!