badminton tournament : नांदेड येथे राज्यस्तरीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेला 14 पासून सुरुवात
नांदेड| महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत नांदेड शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या विद्यमाने मराठवाड्याचे भाग्यविधाते भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकररावजी चव्हाण यांचा जयंती निमित्त महाराष्ट्र ज्युनिअर बॅडमिंटन निवड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 14 जुलै रोजी यशवंत कॉलेज,स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नांदेड येथे सकाळी 10 वाजता सुरवात होणार आहे.
या स्पर्धेचे उदघाटन अध्यक्ष तथा माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती आ. सतीश चव्हाण, आ.श्रीजया चव्हाण , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ सौ.शीला कदम व बी.के.मोहन ,जिल्हा क्रीडा अधिकारी जय ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत राज्यातून 30 जिल्हातील एकूण 248 खेळाडूंनी सहभाग नोंदविला ...
