Dr. Ramesh Naik | डॉ. रमेश नाईक यांचा कळमनुरी मतदार संघात धावता दौरा – NNL
हिंगोली/कळमनुरी| तालुक्यातील कनका गावचे भूमिपूत्र असलेले व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. रमेश मस्के नाईक यांनी नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कळमनुरी मतदारसंघातील गावा-गावांत भेटी गाठी वाढवून नव्या राजकीय प्रवासाला चालना दिली आहे.
1990 पासून शिवसेनेशी डॉक्टर रमेश मस्के यांचे कुटुंब जोडले गेलेले आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर कळमनुरीत निर्णायक असणाऱ्या व बहुतांश शिवसेनेशी निगडित असलेल्या हटकर समाजातून ते येत असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाकडे सर्वच राजकीय धुरीणींचे लक्ष लागले होते. अत्यंत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर रमेश मस्के हे सर्व दूर परिचित आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गोरगरीब आणि गरजू लोकांची सेवा केली आहे. मागील १८_२० वर्षापासू...
