Navratri festival starts : नवसाला पावणाऱ्या कालिंका मंदिरात घटस्थापना व अलंकार सोहळ्याने नवरात्रोत्सव प्रारंभ -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा नगरीची कुलस्वामिनी नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता पूजेचे मानकरी यांच्या हस्ते व पुरोहित कांता गुरु वाळके व साईगुरु बडवे यांच्या मधुर वाणीत अभिषेक व अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी महाआरती करून प्रसादाचे वितरण झाले, आगामीं नऊ दिवस मंदिरात नवरात्रोत्सवाचे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
नवरात्रोत्सवात नित्यनेमाने दररोज सकाळी आणि रात्री महाआरती केली जाणार आहे. दि.०३ गुरुवार ते दि.०९ बुधवार पर्यंत दररोज दुपारी ०१ ते ७ या वेळेत संगीतमय देवी भागवत कथा हभप एड नारायण महाराज सोनखेडकर यांच्या मधुर वाणीत होणार आहे. दररोज आरतीनंतर सायंकाळी कालिंका देवी नवरात्रोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. देवी भागवत कथेचा समारोप शेवटच्या दिवश...
