In Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार। तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या नगदी पीक सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ झाला असून, खरीप पेरणीतील सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. परंतू हाती आलेल्या उत्पादनात विक्रमी घट निर्माण झाली असून, प्रती बॅग ५ ते ६ पोते भरत असले तरी सोयाबीनची प्रतवारी खराब असल्याचे शेतकऱ्यांतून सांगीतले जात आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत हाती आलेल्या उत्पादनात झालेली घट शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटणारी ठरत असून, व्यापाऱ्याकडून कमी भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात वाढ होत आहे.
हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर भौगोलिक क्षेत्र असून, ३९ हजार सहाशे चौर्हेचाळीस हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. नगदी पीक सोयाबीन सर्वाधिक १९ हजार आठशे सत्यान्नव हेक्टरवर पेरा करण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्याचं पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कपाशीची लागवड १४ हजार दोनशे चोवीस...

