Saturday, June 27

Tag: in Himayatnagar city and rural areas

Ganpati Bappa immersion : हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे थाटात विसर्जन

Ganpati Bappa immersion : हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे थाटात विसर्जन

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे गुरुवारी सकाळी मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिनांक २७ बुधवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घराघरात बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चना, महाप्रसादाचा भोग अर्पण करत आगामी येणारा काळ सुख समृद्धी, निरोगी व निरामय ठेऊन देशाची शांतता अबाधित ठेवण्याचे साकडे अनेकांनी गणपती बाप्पाना घातले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी एक दिवस व दीड दिवसांच्या गणरायाला भाविक भक्तांनी पांडवकालीन श्री कनकेश्वर तलावाच्या विहिरीत गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला. येथील घाटावर बाप्पाला निरोप देण्यासाठी बालगोपाळांसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने गणरायाला साकडे घालत विसर्जन करून पुढच्या वर्...
Festival of King Shiralsheth : शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा -NNL

Festival of King Shiralsheth : शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा -NNL

धार्मिक, नांदेड
हिमायनगर,अनिल मादसवार| नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या शिराळशेठ राजाचा उत्सव हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. नववधू सहित महिलांनी श्रियाळ राजाच्या भोवताली गाणे म्हणत गोल फिरत आराधना केली. त्यानंतर सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्याने श्री परमेश्वर मंदिरापर्यंत श्रियाळ राजाची मिरवणूक काढून शिराळबाई शिराळ..... शिराळाच्या लाह्या... असे म्हणत परंपरेनुसार महाआरती करून शंभूच्या नावाने हरहर बोला म्हणत विसर्जन केले. याबाबात एक आख्यायिका सांगितली जाते ते म्हणजे पैठण येथे इतिहास प्रसिद्ध गर्भश्रीमंत शहरात शिराळशेठ के एक सावकार होते. त्या काळात दक्षिण भारतात तीव्र दुष्काळ पडला होता. अन्न व पाणी यासाठी जीव गमावण्याची वेळ जनतेवर आली होती. व्यवसायाने सावकार असलेले शिराळशेठ परंतु मनाने उदार होते. त्या काळी त्यांनी स्वत: जवळ असलेल्या धान्यांची कोठारे गोरगरिबांना देण्या...
error: Content is protected !!