स्टॉप डायरिया अभियानाचा शुभारंभ; जिल्हयातील प्रत्येक गावात मोहिम राबविण्यात येणार -NNL
नांदेड| जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत असून नांदेड जिल्हयातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त आज बुधवार दिनांक 3 जूलै रोजी या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. गंगथडे, शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी द...
