मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची 17 सप्टेंबर पासून प्रत्येक गावात सुरूवात
नांदेड| राज्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरूवात बुधवार 17 सप्टेंबर 2025 पासून होत आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे अर्धापूर तालुक्यात मौ. पिंपळगाव (म.) येथे ग्रामसभेत उपस्थितीत राहून मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करुन या अभियानाची सुरूवात करणार आहेत.
जिल्हयातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले असून एका गावात स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरूवात करणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावस्तरावरील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार...
