Wednesday, May 13

Tag: in Degloor Naka area due to a short circuit.

short circuit : देगलूर नाका परिसरातील ‘कूल लँड कलर’ दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

short circuit : देगलूर नाका परिसरातील ‘कूल लँड कलर’ दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

नांदेड
नांदेड| शहरातील देगलूर नाका परिसरात बरकत कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या 'कूल लँड कुलर'च्या दुकानाला आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. दुकानाचे मालक मोहम्मद इक्बाल यांनी सांगितले की, दुपारी अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली. काही क्षणांतच आगने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून फक्त आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून आगीच्या कारणांची चौकशी सुरू आहे. दुकान मालकाने प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे....
error: Content is protected !!