Apparaopeth flood: आप्पारावपेठच्या नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने पाच वर्षाचा लहान बालकाचा मृत्यू
शिवणी/किनवट,प्रतिनिधी| किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील असलेल्या मौजे अप्पारावपेठ येथे गुरुवारी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील विविध नाल्याला पूर आला. दरम्यान शेताकडून बैलगाडीवर घराकडे येताना पुराच्या पाण्याच्या प्रवाहात बैलगाडी उलटून पाच वर्षाचा अभिनव हा लहान बालक पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर यातून बैलगाडीत अन्य लोक दैव बलवत्तर म्हणून बाहेर पडले आहेत.
किनवट तालुक्यासह शिवणी इस्लापूर परिसरात मागील काही दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. दिनांक १२ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोठा पाऊस झाला. या पावसामुळे अप्पारावपेठ येथील शेतकरी गजराम गुमुल व त्यांची सून अर्चना गजेंद्र गुमुल आणि पाच वर्षाचा नातू अभिनय गजेंद्र गुमुल सह इतर दोन महिला बैलगाडीवर घराकडे येत असताना गावाजवळील नाल्यातून नाला पार करत असताना अचानक आलेल्या पुरात बैलगाडी उल...
