Nanded district Election Result : नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी -NNL
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालानुसार किनवट येथून भाजपचे भिमराव केराम, हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, भोकर विधानसभेतून भाजपाच्या श्रीजया अशोकराव चव्हाण, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिडके, लोहा विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव पाटील चिखलीकर, नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून डॉ. तुषार राठोड हे विजयी झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला 5 जागा, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1 अशा एकुण 9 जागा निवडून आल्या आहेत. तर विधानसभेसोबतच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र चव्हाण विजयी झाले आहेत आज झाले...
