Farmers are upset : आयडीबीआय बँकेच्या भोंगळ कारभाराला शेतकरी वैतागला
देगलूर, गंगाधर मठवाले | तालुक्यातील मौजे शहापूर येथील आयडीबीआय बँकेत शेतकरी सोने तारन ठेवून कर्ज उचलून सोयाबीन व खते आणण्यासाठी गेले असता सोन्याची पारक करणारा, वजन करणारे सावकार नसल्याने तूमचे कर्ज होत नाही. दुसऱ्या बँकेत जाऊन कर्ज उचला असे आयडीबीआय बँकेचे मुजोर व्यवस्थापक शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत. बैंक अधिकाऱ्याच्या या भोगळ कारभाराला शेतकरी वैतागला असून, तात्काळ येथील अधिकाऱ्याची उचबागडी करून सोने पारक करणारा दुसरा व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
शहरापुर येथील आयडीबीआय बँकच्य शाखा व्यवस्थापकी पदी चौधरी यांनी पदभार हाती घेतल्यापासून कायम शेतकऱ्यांची उपेक्षाच होत आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले अधिकारी आता शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज देण्यासाठी चालढकल करत आहेत. व्यापारी, आडत, बिरबार, दुकानदार, हॉटेल, आशा लोकांनी बँकेत सरळसरळ व्यवहार ...
