Deglur Strike ; जीव गेला तरी चालेल उपोषणापासून माघार घेणार नाही
देगलूर, गंगाधर मठवाले| लेंडी बुडीत क्षेत्रातील बारा गावांची विविध प्रश्न विचारात घेऊन दिनांक 4 ऑगस्ट पासून एडवोकेट इर्शाद पटेल यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. रावणगाव पुनर्वसन येथील घळभरणीच्या कामाने अगोदरच जीवाला घोर लावले असताना प्रकल्पग्रस्तांच्या संतापात अजून भर पडली ती म्हणजे पुनर्वसनातील 18 नागरी सुविधेतील होत.
असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांनी. म्हणूनच की काय इर्शाद पटेल यांनी रावणगाव येथील सर्व नागरिकांना एकत्रित करून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी उपजिल्हाधिकारी देगलूर यांनी उपोषण स्थळी भेट दिली. भेटीदरम्यान पटेल यांनी प्रकल्पग्रस्त यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. शिवाय शासन निर्णयानुसारच मागण्या मागितल्या असल्याचा खुलासा केला असून सदरील मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात.
या विषय...
