P. Pu. Child Yogi Venkatesh Maharaj : नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते – प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज – NNL -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| कलियुगात संसाररूपी मायेच्या विषामुळे मनुष्य जीवन जखडलं गेलं आहे. हे विषारी वलय बाहेर काढून फेकायचं असेल आणि मानसिक समाधान मिळवायचं असले तर "ओम नमः शिवाय" नामाचा अथवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका भगवंताच्या नामाचा जाप करणे हा एकमेव उपाय आहे. यासाठी प्रत्येक मनुष्याने नित्यनेमाने नामजप केला तर मनुष्य जीवन अमृतमय होऊन जाते. असे अमृतमय विचाराचा संदेश श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थांन पिंपळगावचे मठाधिपती प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज यांनी उपस्थित भाविक भक्तांना दिला.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात प. पु. बालयोगी व्यंकटेश महाराज यांच्या सूचनेवरून पवित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून "ओम नमः शिवाय" नामजप यज्ञाला सुरुवात झाली आहे. यज्ञाच्या सोळाव्या दिवशी म्हणजे दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी अचानक स्वामीजींनी भेट दिल्यानंतर उपस्थित भाविकांना...
