Dr. Manohar Chaskar : अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त व्हावा- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL
नांदेड| लोकभावना, वेदना आणि आकांक्षा व्यक्त करण्याचे सामर्थ्य नटाकडे असते. उत्तम अभिनयामुळे यशाची उत्तुंग शिखरे गाठता येतात. चांगला अभिनेता हा जनतेचा सूक्ष्मनिरीक्षक असतो, अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त झाला पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी ‘फाउंडेशन कोर्स इन स्क्रीन अॅक्टींग’ प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या समारोप प्रसंगी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ललित व प्रयोगजीवी कला संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समारोप व पारितोषिक वितरण दि. १० ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परि...
