Honoring meritorious children of employees | मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार -NNL
नांदेड| सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महापालिकेच्या कामकाजास नवि दिशा देऊ पाहणाऱ्या मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा दिनांक २३ जुलै २०२४ रोजी महापालिकेत कै.शंकरराव चव्हाण सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अनुष्का शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
काही दिवसापूर्वी महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहित करण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला होता. त्याचाच भाग म्हणून इयत्ता १...
