Marathi Language : मराठी भाषा : अभिजाततेचा सन्मान, जागतिक विस्तार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषिकांसाठी (Marathi Language) अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली पासून गल्लीपर्यंत एक मंतरलेले वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. मराठी भाषा तिचा विस्तार (Honor of Elegance, Global Expansion) घराघरातील मराठी मराठीच्या अन्य भाषिक भगिनी मराठीचा विस्तार सात समुद्रापलिकडे गेलेली मराठी अशा अनेक विषयांवर चर्चा रंगत आहे ऊर भरून यावा असे वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा ऐतिहासिक वारसा, तिची प्राचीनता, शासनाच्या योजना आणि जागतिक स्तरावरील आपल्या माय मराठीची नोंद या सर्व घटनाक्रमाचा उहापोह करणे औचित्यपूर्ण आहे.
मराठी भाषेचे प्राचीन संदर्भ
मराठी ही इंडो-आर्यन भाषाकुटुंबातील महत्त्वाची भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषे...
