Friday, May 15

Tag: himself is on the ground

Cleanliness City : हिमायतनगर शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात

Cleanliness City : हिमायतनगर शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता नवनिर्वाचित व लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी थेट मैदानात उतरून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत शहरातील बसस्थानक परिसर व मुख्य रस्त्यांची स्वच्छता स्वतः उपस्थित राहून करून घेण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसावी, शहरातील नागरिकांकडून स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये, यासाठी नगराध्यक्षांनी नगरपंचायत स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना “स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही” असा ठणकावून इशारा दिला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष शेख रफिकभाई म्हणाले की,“नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेबाबत चिंता करू नये. स्वच्छतेसह शहरातील इतर कोणतीही समस्या असल्यास थेट नगरपंचायतीकडे किंवा माझ्याकडे कळवावी. त्या समस्यांचे तात्काळ निराकरण केले जाईल.” नगराध्यक्ष स्वतः रस्त्यावर उभे रा...
error: Content is protected !!