हिमायतनगर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात ; दमदार पावसाची प्रतिक्षा – NNL
हिमायतनगर| तालुक्यात चांगल्या प्रकारे पाऊस बरसल्याने खरिपाच्या पेरणीला आता वेग आला आहे. जवळपास ७०% पेरण्या पुर्णत्वास आल्या असून, उर्वरित पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. या वर्षी ३९ हजार ६४४ हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी होणार आहे. यात नगदी पिक सोयाबीनचा पेरा एक नंबर राहणार असून, कपाशी दोन नंबर वर राहणार आहे. तालुक्यातील काही भागात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यानी सुरुवातीला केलेली पेरणी धोक्यात आली असून, त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार ६७८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून पेरणीयोग्य क्षेत्र ३९ हजार ८७० हेक्टर आहे. गेल्या खरिप हंगामात ३९ हजार ६४४ हेक्टर वर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी सर्वाधिक १९ हजार ८५७ हेक्टर वर नगदी पिक सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. तर कपाशीची लागवड १४ हजार २२४ हेक्टर वर ...
