Monday, May 25

Tag: Heavy rains in Kandhar taluka

Kandhar Flood : कंधार तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी ; दोन तलाव फुटले : जगतुंग तलाव तुडुंब, ४४ जनावरे वाहून गेले

Kandhar Flood : कंधार तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी ; दोन तलाव फुटले : जगतुंग तलाव तुडुंब, ४४ जनावरे वाहून गेले

नांदेड, महाराष्ट्र
कंधार, सचिन मोरे| गेल्या ४८ तासापासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील चिखली,बोरीचा तलाव फुटला तर ४४ जनावरे वाहून गेले.दोन गावे पुराच्या पाण्याने वेढलेले आहेत.बाधित गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. तसेच तालुक्यातील अतिवृष्ठीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्याचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दि.७ आगस्ट च्या रात्रीपासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे, जवळपास ३० ते ३५ गावात पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर तालुक्यातील चिखलीचा भवानी तलाव व बोरीचा तलाव फुटला असून नंदनवनच्या तलावास धोका निर्माण झाल्यामुळे सांडवा खोदण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. तालुक्यातील २१ पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला. लिंबोटी धरणाचे १५ दरवाजे उघडल्यामुळे पुराचे पाणी मन्याडीत ...
Heavy rains in Kandhar : कंधार तालुक्यात पावसाचा रौद्ररूप हजारो हेक्टर शेती बाधित : कोट्यवधीचे नुकसान

Heavy rains in Kandhar : कंधार तालुक्यात पावसाचा रौद्ररूप हजारो हेक्टर शेती बाधित : कोट्यवधीचे नुकसान

कृषी, नांदेड
कंधार, सचिन मोरे| तालुक्यात २७ ऑगस्टच्या रात्री पासून २८ ऑगस्टच्या संध्याकाळ पर्यंत पावसाने रौद्ररूपधारण केले असून यामुळे तालुक्यातील २८ गावात पाणी शिरले आहे. सहा जनावरे पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. तर जाकापुर व भिकमारी ही दोन गावे पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत. त्याच बरोबर २१ गावाचे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील पुलावरून मन्याडीचे पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आठ दिवसापूर्वी तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन बाधित झाली होती. यात शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले होते. ती परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी रात्री पासून पावसाने ...
error: Content is protected !!