Friday, June 26

Tag: Heavy rains cut off communication between villages

Heavy rains : पावसाच्या थैमानाने गावांचा संपर्क तुटला; खरीप पिकांची मोठी हानी

Heavy rains : पावसाच्या थैमानाने गावांचा संपर्क तुटला; खरीप पिकांची मोठी हानी

कृषी, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर परिसरात मुसळधार पावसाने थैमान घालून रौद्ररूप धारण केले आहे. सतत तीन–चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून केलेली निदणी, कोळपणी व फवारणी पावसामुळे वाया गेली आहे. पिकात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात खरीपाचे पिक हातातून गेल्याने मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढत असून काही ठिकाणी गावात पाणी शिरू लागले आहे. या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. पोकळ आश्वासन नको, कृती करा – जनतेचा लोकप्रतिनिधींना सवाल प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आणि नेहमीप्रमाण...
error: Content is protected !!