Ex. Chief Minister Ashok Chavan : विकासाच्या कामामध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण -NNL
भोकर, गंगाधर पडवळे| तालुक्यातील भोसी येथे माजी जी. प. सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांन सोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जाणता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की मी व माझे कुटुंबिय आणि भोकर तालुका यांचा अगदी जवळच नात असून माझ्या वडिलांना म्हणजेच स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांना देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत आणि मला राज्याचा मुख्यमंत्री बनविण्याची किमया या भोकर मतदारसंघानी केली आहे त्या मुळे या मतदार संघातील जनतेचे आम्ही उपकार विसरू शकत नाही, तेंव्हा या मतदार संघांच्या विकास कामासाठी मी निधी कधीच कमी पडू देणार नाही तेंव्हा आपले गट तट बाजूला ठेवून मतांचे ध्रुवीकरण(विभाजन ) होऊ देऊ नका व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या समोर भारतीय जाणता पार्टीचा उमेदवार म्हणून श्रीजया अशोक चव्हाण येणार असून तिला प्रचंड मताधिक्यानी व...
