Wednesday, May 20

Tag: Hadgaon depot chief’s ‘‘Garbage basket’’ to MLA Kohlikar’s letter

‘Garbage basket’ : आमदार कोहळीकरांच्या पत्राला हदगाव आगारप्रमुखांची ‘कचऱ्याची टोपली’

‘Garbage basket’ : आमदार कोहळीकरांच्या पत्राला हदगाव आगारप्रमुखांची ‘कचऱ्याची टोपली’

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे आणखी एक गंभीर उदाहरण समोर आले असून, हदगाव आगारप्रमुख यांनी हादगावचे स्थानिक आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अधिकृत पत्रालाच ‘केराची टोपली’ दाखवल्याचा आरोप होत आहे. हिमायतनगर ते उमरखेड (पळसपूर–डोल्हारी–ढाणकी मार्गे) बंद असलेली बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदारांनी करून तब्बल तीन महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. ही बससेवा पूर्वी नियमित सुरू होती. मात्र, काही कारणास्तव ती बंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी विभाग नियंत्रक यांच्याकडे तसेच हदगाव आगाराकडे लेखी पत्र देऊन सदर बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, त्या पत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हिमायतनगर–उमरखेड ही बससेवा उमरखेड, ढाण...
error: Content is protected !!