Gurupurnima Account : Significance of 5 Gurus | गुरूपौर्णिमा लेखांक : ५ गुरूंचे महत्त्व -NNL
या जन्मातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही प्रत्येक जण शिक्षक, डॉक्टर वकील वगैरे दुसर्या कोणाचे तरी मार्गदर्शन घेतो. मग जन्ममृत्यूच्या फेर्यांतून मुक्ति देणार्या गुरूंचे महत्त्व किती असेल, याची कल्पनाही करता येत नाही. पुढील सूत्रांंवरून ते महत्त्व स्पष्ट होईल.
अ. मानसशास्त्रदृष्ट्या
१. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आणि सामथ्र्याची चुणूक न दाखवणार्या देवांपेक्षा, शिष्याच्या उन्नतीसाठी या गोष्टी दाखवणार्या गुरूंकडे शिष्याचे लक्ष जास्त प्रमाणात वेंâद्रित होऊ शकते.
२. गुरूंना अंतज्र्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो.
३. ‘शिष्याला शिकवण्याऐवजी बाबा असे काय बोलतात ?’, असे काही अभ्यासू साधकांना वाटते. त्याविषयी विचारले असता बाबा म्हणाले, ‘‘मला भजी किंवा थालीपीठ आवडते असे म्हणतो, त्यामुळे एखादा शिष्य घरी भजी किंवा थालीपीठ करतो तेव्हा त्या वेळी ...
