Eng. Deglaurkar ; गुरु रविदासांनी एका जातीसाठी नाही तर मानवतेसाठी काम केले – इंजि. देगलूरकर
भुसावळ l गुरु रविदासांनी केवळ एका जातीसाठी नाही तर जगातील संपूर्ण मानवतेसाठी काम केले, म्हणून त्यांना कोणत्याही एका जातीचे दैवत न समजता महामानव समजावे असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र दिपनगर भुसावळ येथील गुरु रविदास जयंती महोत्सवात प्रमुख व्याख्याते म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. यावेळेस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाने हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या प्रभावी भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदासांनी भक्तीचे नाही तर मानवमुक्तीचे काम केले. सर्व प्रकारच्या शोषणाच्या विरोधात लढा दिला. रुढी परंपरा व अंधश्रध्देच्या विरोधात काम केले. जातीयता नष्ट करुन सर्व जा...
