नैसर्गिक आपत्तीचे पूरग्रस्तांचे अनुदान अजून वाटप झाले नाही ; प्रशासन येवढे उदासीन का? – NNL
नांदेड| २६-२७ जुलै २०२३ रोजी नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती.१९० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन च्या वतीने शहरात सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.
३६ वेळा वेगवेगळी आंदोलने प्रशाकीय कार्यालया समोर करण्यात आली. शेवटी दहा हजार रुपये प्रति पीडितास मंजूर करण्यात आले. एकूण नऊ कोटी रुपये नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर झाले होते. त्यापैकी साडे सात कोटी सोईनुसार वाटप करण्यात आले असून राहिलेले दीड कोटी वाटपास तहसील आणि मनपा प्रशासनाने हयगई केली आहे.
सीटू कामगार संघटनेच्या नेतृत्वात १३५ दिवस साखळी उपोषण करण्यात आले. सद्यस्थितीत देखील १० जून पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर चार दिवस आमरण उपोषण व १४ जून पासून बेमुद्दत साखळी उपोषण सुरूच आहे. शासन आदेशाचे उलंघन करून अनुदान वाटप करणाऱ्यांना जिल्हाधिकारी...
