Nanded Sports Complex : नांदेड क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन -NNL
नांदेड| नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी क्रीडा संकुलामध्ये आजपासून राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचा शानदार शुभारंभ करण्यात आला.नांदेडच्या जिल्हा क्रीडा संकुलात या संदर्भातील अद्यावत सेवा उपलब्ध करण्यात आल्या असून जिल्ह्याच्या यजमानपदामध्ये आज याचा प्रारंभ झाला.
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड संयुक्त विद्यमाने व नांदेड जिल्हा आर्चरी (धनुर्विद्या )असोसिएशन यांचे सहकार्याने चालू असलेल्या राज्यस्तरीय शालेय आर्चरी 14,17,19 वर्षे मुले-मुली . क्रीडा स्पर्धेचे आयोजन 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, नांदेड येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेचे उदघाटन आज दि. 19 ऑक्टोंबर,2024 रोजी सकाळी 10.00 वा आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड. महेशकु...
