Grand educational exhibition : श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य शैक्षणिक प्रदर्शनी; यात्रेकरूंमध्ये विशेष आकर्षण
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती लोहा, शिक्षण विभागाच्या वतीने भव्य शैक्षणिक प्रदर्शनी उभारण्यात आली असून, ही प्रदर्शनी यात्रेकरू, विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे.
ही शैक्षणिक प्रदर्शनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेने, तसेच शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे व गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली आहे.
या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये
नवे शैक्षणिक ॲप, अंधश्रद्धा निर्मूलन, शालेय परसबाग, माता-पालक गट, मोफत शैक्षणिक योजना, आपत्ती व्यवस्थापन, विद्यार्थी लाभांच्या योजना, विविध शिष्यवृत्ती योजना, गुड टच–बॅड टच, मुख्यमंत्री माझी शाळा यासह विविध शासकीय शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.
प्रदर्शनस्थळी उपस्थित शिक्षकांकडून यात्रे...
