Kandhar News : ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.कार्लेकर सेवानिवृत्त
Gram Panchayat Officer N.M. Karlekar Retired कंधार, सचिन मोरे| पंचायत समिती, कंधारचे ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.कार्लेकर हे नियत वयोमानानुसार सोमवारी, ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दुपारी २ वाजता कै.वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती, कंधार येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटना व पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जल्लोषात त्यांना निरोप दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती, कंधारचे गटविकास अधिकारी महेश पाटील हे होते. यावेळी विस्तार अधिकारी शिवाजी पानपट्टे, कैलास रेनेवाड, प्रकाश मुसळे यांची प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत अधिकारी एन.एम.कार्लेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर यांची बदली झाल्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आला. राजेश केंद्रे य...
