Elders, let’s go to the pilgrimage! ज्येष्ठांनो चला… तीर्थ दर्शनाला ! – NNL
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा व्यक्तींसाठी राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांना यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” यासाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट आहे. या योजनेसाठी 60 वर्षावरील नागरिकांनी सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करायचे आहेत. 30 हजार रुपयापर्यंत या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.
कशी आहे योजना ?
भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा...
