On Tuesday everyone will go for darshan of Amarnath | मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार -NNL
नांदेड| ९० भाविकांसोबत २३ वी अमरनाथ यात्रा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुखरूप करून आल्यानंतर १०३ यात्रेकरूंचा दुसरा जत्था रविवारी श्रीनगर येथे पोंहचला असून मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
पहिल्या जथ्यातील यात्रेकरूंनी १३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी दिल्या. सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,हास्य कवी प्रताप फौजदार,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, सरदार जागीरसिंघ अमृतसर,सुभाष बंग,केदारमल मालपाणी,अकोल्याचे खत्री परिवार,रेखा भताने,श्याम हुरणे,नारायण गवळी,गोरखनाथ सोनवणे, वंदना सुरेश त्रिमुखे, डॉ.हिवरेकर ,डॉ.नखाते,मधुकर पास्टे, आशुतोष मुखाडे यांनी दरवर्षीप्रमाणे सर्वांना प्रत्येकी एक जेवण दिले.९० यात्रेकरूंच्या एका वेळेसच्या नाश्त्यासाठी योगदान देणाऱ...
