Former Chief Minister Ashok Chavan “नगरपंचायत आमच्या ताब्यात द्या, विकास करून दाखवू !” – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
हिमायतनगर, अनिल मादसवार| “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची मजबूत सत्ता आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर आमचे सरकार असल्याने विकासकामांसाठी कोणतीही अडचण उरणार नाही. त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महायुतीच्या ताब्यात दिल्यास मागील काळात जो विकास झाला नाही, तो विकास आता करून दाखवू” कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार मा. अशोक चव्हाण यांनी केले.
ते हिमायतनगर शहरात भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे बुधवारी (दि. 05 नोव्हेंबर 2025) रोजी आयोजित उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच हिमायतनगर तालुकाध्यक्ष गजानन चायल, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
