garbage was dumped at every nook and corner of Himayatnagar : सत्ता परिवर्तनानंतर हिमायतनगर शहरातील चौका चौकात कचऱ्याचे ढिगारे; नाल्या तुंबल्या -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| नुकत्याच झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर हिमायतनगर शहरातील चौका चौकात कचऱ्याचे ढिगारे साचल्याने आणि गटार नालीचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेमलेल्या सब गुत्तेदाराने कचरा उचलण्यास नकार दिल्याने शहरात हि परिस्थिती उद्भवली. याकडे नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने पाच दिवसापासून ठिकठिकाणी कचरा जमा होऊन सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. काही जागरूक नागरिकांनी नवनिर्वाचित आमदार महोदयांच्या निदर्शनास हि बाब आणून देत नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचे पितळे उघडे पाडले आहे. नागरिकांच्या समस्येची दखल घेत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी तात्काळ कचरा उचलण्याची व्यवस्था करा अश्या सूचना नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक श्री महाजन यांना केल्या आहेत.
विधानसभा निवडणूक होऊन सत्ता बदल झाल्याने शहरात स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेक...
