Agriculture ; भविष्यातील शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारेच शक्य विकसित कृषि संकल्प अभियानाचा आठवा दिवस
नांदेड। विकसित कृषि संकल्प अभियानाच्या 5 जून रोजी आठव्या दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, कापूस लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असून, त्याद्वारे उत्पादनवाढ, मातीची गुणवत्ता सुधारणा आणि कीड व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते. काल 5 जूनचे कार्यक्रम देगलूर तालुक्यातील येरगी, शिवणी, देवापुर व धर्माबाद तालुक्यातील बेलूर, करखेली, बाभुळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या गावांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान, अचूक सिंचन प्रणाली, संकरीत बियाणे आणि कीड व्यवस्थापनासाठी सटीक उपाय यासारख्या आधुनिक संकल्पनांवर सखोल चर्चा झाली.
विशेषतः कापूस शेतीसाठी रोपसंपादन, स्मार्ट सिंचन पद्धती, कीटकनाशकांचा नियंत्रित वापर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, कापूस लागवडीसाठी संक...
